मुख्यमंत्री आज अमरावतीत, समृद्धी महामार्गाची करणार पाहणी

0
326

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज 5 डिसेंबर 2020 रोजी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा दौरा
सकाळी 10.20 वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर , मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण. 11.15 वाजता मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव.
दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण. 2 वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव. दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण. औरंगाबाद येथे आगमन व 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण.

Previous articleशकुंतला इतिहास जमा करणे षड्यंत्र की संयोग !
Next articleकिरण रामराव सरनाईक विजयी घोषित; अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here