विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत

0
288

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सामान्यपणे दरवर्षी हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे घेण्यात येते. मात्र, या वर्षी अधिवेशनावर कोरोना महासाथीचे सावट असल्याने नागपूरऐवजी मुंबईतच अधिवेशन घेण्यात येणार आहे. अधिवेशनाचा कालावधीही कमी करण्यात आला आहे.
विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री परब, मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

Previous articleशेतक-यांच्या आत्मसन्मानासाठी भारत बंद आंदोलनात सहभागी व्हा – जयश्रीताई शेळके
Next articleघरकुलासाठी हजार रुपयाची लाच घेतांना अभियंता जाळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here