व-हाड दूत न्युज नेटवर्क
अमरावतीः शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या अंतिम निकालाची अद्याप प्रतिक्षा आहे. जाेपर्यंत निकाल जाहिर हाेत नाही ताेपर्यंत दारुची दुकाने उघडणार नसल्याने मद्यपींचा चांगलाच हिरमाेड झाला आहे. निकाल कधी लागताे अन चिअर्स कधी करताे अशी काहीशी मनस्थिती मद्यपींची झाली आहे.
मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020 निमित्त जाहिर केलेल्या काेरड्या दिवसाचे अनुषंगाने दाखल केलेल्या याचिकेनुसार, न्यायालयाच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क अ.अ.कानडे यांनी 3 डिसेंबरराेजी मद्यविक्री बंद राहिल असे जाहिर केले हाेते. यानुसार मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबरराेजी सायंकाळी 5 पर्यंत तर मतमाेजणीच्या दिवशी 3 डिसेंबरराेजी निवडणूकीचा निकाल जाहिर हाेईपर्यंत मद्यविक्री बंद राहील असे जाहिर करण्यात आले हाेते. संध्याकाळचे 6.30 वाजले तरी निवडणूकीचा निकाल अंतिम निकाल अद्याप जाहिर झाला नाही. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने उघडली नाहीत. त्यामुळे निवडणूक निकालाची उमेदवार, शिक्षक मतदारांसाेबतच मद्यपींनाही तेवढीच प्रतिक्षा लागल्याचे दिसून येते.
नमुद वेळेत मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती विक्रेत्यांनी बंद ठेवाव्यात. आदेशाचे तंताेतंत पालन करण्यात यावे, सदर आदेशाचे उल्लंघन करणा-या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशाराही राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक अ.अ.रानडे यांनी दिला आहे.