व-हाड दूत न्युज नेटवर्क
अहमदाबाद: कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरात हायकोर्टाने मास्क न लावता फिरणा-यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जे लोक मास्क न लावता फिरतील त्या लोकांकडून दंड वसूल करा नाहीच ऐकले तर त्यांची ड्युटी कोविड केअर सेंटरमध्ये लावा असे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येते. नियमांचे उल्लंघन करणारे व्यक्तींना आता 10 ते 15 दिवस कोविड केअर सेंटरमध्ये काम करावे लागणार आहे. गुजरातमध्ये राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तर विवाहामध्ये 100 व अंत्यसंस्कारासाठी 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.