वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती: एका अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याने पैठणी व एक हजार रुपये रोख दिल्याची तक्रार एका मतदाराने केली असून, त्याची लेखी फिर्याद भरारी पथकाने नोंदवून घेतली आहे.
वाशिम तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार रिसोड येथील डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय येथील सहायक शिक्षक प्रकाश आनंदा बोरकर यांनी याबाबत लेखी बयाण दिले आहे. अपक्ष उमेदवार किरणराव सरनाईक यांच्या कार्यकर्त्यांनी एक पैठणी व एक हजार रुपये रोख दिल्याचे बयाणात नमूद आहे, तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीची नोंद भरारी पथकाने घेतली आहे. पुढील कार्यवाही होत आहे.