वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: चाकूने भोसकून पत्नीची हत्या केल्याची घटना शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दित घडली.
संगीता प्रशांत इंगळे असं मृतक पत्नीचं नाव तर प्रशांत इंगळे असं मारेकरी पतीचं नाव आहे. आरोपी पती प्रशांत इंगळे हां रोजगारकरिता नाशिक येथे असून तो आपल्या मुलाला नेण्याकरिता आज अकोल्यात आला होता. यावेळी प्रशांतच्या आपातापा रोड़वरील एकता नगरातील राहत्या घरी पती-पत्नींमध्ये मुलाला नेण्यावरुन भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेल्याने आरोपी पतीनं रागाच्या भरात पत्नी संगीता हिच्या पोटावर चाकुने वार करून तिची हत्या केली.
गेल्या अनेक दिवसांपासून पती-पत्नीत वाद होत होते. तेव्हापासून संगीता ही अकोट फ़ैल परिसरात रूम करून तिन्ही मुलांबरोबर राहत असल्याची माहिती समोर येत आहे.