व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणाः शिवसेना जिल्हा प्रवक्तापदी पत्रकार गजानन धांडे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र देवून सन्मानित केले. यावेळी डाॅ. संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, प्रा. नरेंद्र खेडेकर, बुलडाणा तालुकाप्रमुख लखन गाडेकर आदी शिवसैनिक उपस्थित हाेते.