मंगेश फरपट | वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
शेगाव: श्री संत गजानन महाराजांचे मंदिर 17 मार्च 2020 पासून शासनाच्या निर्देशानुसार दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने मंदिरांसह धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे, या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मंगळवार 17 नोव्हेंबर पासून शेगाव येथील श्रींचे मंदिर सुद्धा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यासाठी भाविकांना ई पासद्वारे श्रींचे दर्शन घ्यावे लागणार आहे. मंदिरात भाविकांनी गर्दी करू नये, तसेच दर्शनासाठी येताना शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही संस्थांनतर्फे करण्यात आले आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मिळवा ई-दर्शन पास –