व-हाड दूत न्युज नेटवर्क
मलकापूर : मलकापूर, नांदुरा, मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधवांना कापूस विक्रीची सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर ने पुढाकार घेतला आहे. भारतीय कपास निगम (सिसीआय) अंतर्गत कापूस खरेदीसाठी 15 नोव्हेंबरपासून सकाळी 8 वाजतापासून ऑनलाईन नाव नोंदणी सुरु करण्यात येत आहे.
ज्या शेतकरी बंधूंना आपला कापूस शेतमाल सिसीआय मध्ये विक्री करायचा आहे. त्यांनी www.apmcmalkapur.com / myapmc mobile app वर नोंदणी करावी, असे आवाहन मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. अरविंद कोलते, उपमुख्य प्रशासक संतोषराव रायपुरे, सचिव भ.ज.जगताप यांनी केले आहे.
जाणून घ्या, वेबसाईटवर नोंदणी ची पद्धत ..
जाणून घ्या , मोबाईल अँप्स वर कशी करावी नोंदणी..
जनजागृतीसाठी कोलते अभियांत्रिकीचा पुढाकार
मलकापूर येथील डॅा. व्ही.बी.काेलते अभियांत्रिकी महविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांच्या संकल्पनेतून शेतक-यांना कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची माहिती व्हावी यासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या मार्गदर्शनात प्रा. मयूरी दिनकर पाटील यांनी हा व्हिडीओ संपादित केला आहे. तर संगणक विभाग प्रमुख प्रा. सुदेश फरपट यांनी यासाठी सहकार्य केले.