वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: फटाक्यांवर बंदीविषयी निर्देश नसल्याचे स्पष्ट करुन कानठळ्या बसवणा-या तसेच चीनी फटाक्यांवर बंदी आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून झाड, फुलझडी अशा फॅन्सी फटाक्यांना मागणी असल्याची माहिती किरकोळ फटाका विक्रेता संघाचे अध्यक्ष श्याम महाजन यांनी दिली.
दिवाळीमध्ये विशिष्ट डेसीबलचे फटाके उडवावेत असे निर्देश प्राप्त झालेले नाहीत. फॅन्सी फटाक्यांकडेच लोकांचा कल आहे. त्यादृष्टीने आम्ही देखील मागणी करत असतो आणि ग्राहकांकडूनही अशाच फटाक्यांना पसंती मिळते, असे महाजन यांनी सांगितले.
फटाके बंदीविषयी अद्याप निर्देश नाहीत
फटाके बंदीबाबत प्रशासनाला सरकारकडून अद्याप निर्देश प्राप्त झालेले नाहीत, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.