वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: एसटी कर्मचा-यांना पगार न दिल्याने दोन कर्मचा-यांनी आत्महत्या केली. कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी पगार देऊ असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले होते. परंतु अद्याप वेतन दिलेले नाही. या कर्मचा-यांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा भाजपकडून करण्यात आली.
एसटी कर्मचारी मनोज चौधरी यांनी जळगाव येथे तसेच रत्नागिरीचे पांडुरंग गडदे या कर्मचा-यांनी आत्महत्या केली. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सणासुदीच्या काळात शासनाने ही वेळ कर्मचा-यांवर आणली आहे. लालपरीची चाके थांबली तर त्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकार घेणार काय,असा सवाल जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे,आमदार हरीश पिंपळे, किशोर पाटील,तेजराव थोरात, विजय अग्रवाल,महापौर अर्चना मसने यांनी केला. दिवंगत कर्मचा-यांना भाजपा कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही,असेही भाजपच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे.