मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा: केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशभाऊ एकडे यांच्या नेतृत्वात सोमवारी, 9 नोव्हेंबररोजी तहसील कार्यालयावर शेतक-यांचा धडक ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.,
हा मोर्चा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून सकाळी 10 वाजता निघेल. या मध्ये शेतकरी बांधवांसह नांदुरा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नांदुरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीने केले आहे.