कोरोना रुग्णसेवेत बुलडाण्याचा अटकेपार झेंडा ! केळवदचे डॉ. सोपान पाटील वाचविताहेत मुंबईचे प्राण

0
632

देशातील सर्वात मोठ्या बीकेसी कोविड हॉस्पिटलमध्ये सेवारत

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाची दहशत कायम असून गल्लीत पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याचे कळल्यावर कुणी घराबाहेरही निघत नाही. तर रिक्त जागा असूनही डॉक्टर्स सेवा द्यायला तयार नाहीत.अशा संकटग्रस्तकाळात बुलडाणा जिल्ह्यातील केळवद येथील शेतकरीपूत्र डॉ.सोपान गजानन पाटील चीनमधील वूहानच्या धर्तीवर मुंबईत उभारलेल्या भारतातील पहिले आणि जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या ट्रान्सझीट कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांमध्ये राहून मुंबईकरांचे प्राण वाचविण्यासाठी रात्रंदिवस धडपडत आहे. त्यामूळे बुलडाणा जिल्ह्याने कोरोनाकाळातील रुग्णसेवेचा झेंडा अटकेपार खोवल्याचे प्रेरणादायी चित्र आहे.

कोरोना विषाणू विरुद्ध सारेच विश्व एक दिलाने लढत आहे.या लढ्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे.मात्र काही सेवाभावी निडरपणे कोरोनाशी लढत आहेत. केळवद येथील डॉ. सोपान गजानन पाटील हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी मातीचा ओलावा जपत मुंबईच्या नामांकित मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकी मिळविली. दरम्यान मे महिन्यात कोरोनाने मुंबईत उद्रेक केला. जग भीतीने भेदरून गेले होते. सरकार हतबल तर दररोज कोरोना पेशंटची वाढती संख्या चिंता वाढवत होती.हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जागा मिळत नव्हती अशा संकटकाळात डॉ.सोपान यांनी महाराष्ट्र सरकारने मुंबईत वुहानच्या धर्तीवर बीकेसीच्या मोठ्या मोकळ्या मैदानात उभारलेल्या भारतातील पहिल्या आणि जगातील दुसऱ्या मेगाशिफ्ट 2 हजार बेडच्या बीकेसी जम्बो ट्रान्सझिट हॉस्पिटलमध्ये सेवा देण्याची मनाची तयारी केली.चीनमधील वूहानच्या धर्तीवर हे हॉस्पिटल नुकतेच उभारण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केले होते.परंतू एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नवखा व मोजकाच स्टाफ होता. कुणाला अनुभव नव्हता किंवा कोणी डॉक्टर इथे काम करायला तयार ही नव्हते, तेव्हा हे शिवधनुष्य पेलण्यासाठी सायन हॉस्पिटलमध्ये एफएमटी डिपार्टमेंट चे हेड असलेले डॉ.राजेश डेरे हे पुढे आले. डॉ.डेरे यांनी त्यांच्याच हाताखाली डॉक्टर झालेले आणि सोबत काम करत असलेले 5 नवखे डॉक्टर विद्यार्थी सोबत घेतले आणि सेवा सुरु झाली.त्या 5 डॉक्टरांपैकी एक म्हणजे बुलडाण्याचे डॉ.सोपान पाटील होते. मनुष्यबळ कमी असल्याने डॉ.सोपान यांचेवर खूप जबाबदाऱ्या आल्या.
हॉस्पिटलला लागणारे मनुष्यबळाच्या भरती पासून तर ट्रेनिंग पर्यंतची तसेच बॉक्सेस उचलणे, पत्र टाइप करून फाईल बनवुन पाठवणे, फार्मासिस्ट नसल्यामुळे रात्रीचे २-३ वाजता वॉर्ड मधे लागणारे औषधे देणे तसेच प्लांबिंग, पाण्याची अडचण, विद्युतीकरण अडचणींवर मात करणे आणि ऑक्सिजन प्लाँन्टमधे ऑक्सिजन लेव्हल चेक करणे असे विविध प्रकारची कामे सामाविष्ट होती आणि या सर्व कामात डॉ.सोपान व त्यांचे इतर सहकाऱ्यांचे योगदान राहीले आहे.

१२ हजारापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार…

आजपर्यंत बीकेसी कोविड हॉस्पिटलला १२००० पेक्षा जास्त रुग्णांचा उपचार झाला आहे. आज ८०० पेक्षा जास्त मेडिकल स्टाफ काम करत आहे.डॉ. सोपान सध्याही संपूर्ण हॉस्पिटलला लागणारे औषधे व इतर वस्तूंचे नियोजन, डीन ऑफिसचे कोऑर्डीनेशन आणि मुंबई मधील इतर कोविड हॉस्पिटल सोबत समन्वय ठेवून कर्तव्य बजावत आहेत.

मातीशी नातं घट्ट आहे : डॉ सोपान पाटील

रुग्णसेवेची संधी उपलब्ध झाल्याने सहकाऱ्यांसोबत काम करीत आहो. जवळपास १२ हजार रुग्णांवर उपचार झालेत. पॉझिटिव्ह रुग्ण सुधारण्याचे प्रमाण वाढले असून आता पर्यंत एकही रुग्ण दगावलेला नाही, हे विशेष आहे.लवकरच देश कोरोनामुक्त होवो. – डॉ. सोपान पाटील, केळवद बुलडाणा ह.मु.मुंबई

Previous articleअकोला पोलीस दक्ष, चोर भामट्यांंवर लक्ष
Next articleअल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षाची शिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here