वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: दिवाळीच्या गर्दिचा गैरफायदा घेऊन नागरिकांचे दिवाळे काढणार्या भामट्यांना अकोला पोलिसांनी वठणीवर आणण्याचे आव्हान स्वीकारले आहे. गुरूवारी एक ईसम ए टि एम मधुन बाहेर पडत रक्कम मोजत असताना एका भामट्याने बळजबरी करुन रक्कम पळवून नेली. नागरिकांनी या चोराचा पाठलाग करून त्याला पकडण्यासाठी धडपड केली पण ती अयशस्वी ठरली. याबाबत सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांनी पुढाकार घेत चोविस तासाच्या आत संबंधित चोराला जेरबंद केले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात हि कारवाई झाली. दिवाळ सणात होणार्या खरेदीसाठी गर्दी करणार्या नागरिकांकरिता अकोला पोलिसांनी मचान उभारून त्यावर चोर भामट्यांवर लक्ष केंद्रित करण्याची तयारी केली आहे. या कामात निष्णात असणार्या कर्मचारी वर्गाला त्या मचानांवर तैनात केले आहे. अगोदरच कोरोना अतिवृष्टीमुळे आर्थिक खस्ता खाऊन मुलाबाळांसाठी कशीबशी दिवाळी साजरी करणार्या नागरिकांना अकोला पोलिसांनी दिलासा दिला आहे. या जनहित भूमिकेबाबत अकोला पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.