दवाखान्याची तोडफोड करून डॉक्टर कुटूंबियांना केली मारहाण

0
338

साखरखेर्डा: येथील पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या शेंदुर्जन येथील डॉ. शिवकुमार काळे यांच्या दवाखान्यावर आज ६ नोव्हेंबरच्या दुपारी संतप्त महिलांनी
हल्ला करुन दवाखान्याची तोडफोड करीत डॉक्टरसह कुटूंबियाला मारहाण
केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ
उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार पंधरा दिवसांपुर्वी येथील शिक्षक प्रदिप कंकाळ
यांच्या बारा वर्षीय मुलाचा बुलडाणा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तत्पूर्वी त्या मुलावर शेंदुर्जन येथील डॉ. काळे यांनी प्रथमोपचार केले
होते. मात्र डॉ. काळे यांनी चुकीचे उपचार केल्याने आमच्या मुलाचा मृत्यू
झाल्याची तक्रार मृताच्या कुटुंबियांनी सबंधीतांकडे करून त्यांना अटक
करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान पंधरा दिवसानंतर मृतक
कुटुंबातील विस ते तिस महिला आज अचानक डॉ. काळे यांच्या दवाखान्यावर
धडकल्या. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी डॉक्टरची कार, दवाखान्याची
तोडफोड करायला सुरुवात केली. त्यानंतर आत घुसून डॉ काळे, त्यांची पत्नी,
मुलगा, मुलगी यांना लाठ्याकांठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी
डॉ. काळे यांनी घराचे दरवाजे बंद करून आत जीव मुठीत धरून वाचवा वाचवा ची
विनवणी करीत होते.या घटेनीची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस तातडीने
घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मारहाण व तोडफोड करणार्या महिलांना पोलीस
ठाण्यात घेऊन गेले. वृत्त लिहीपर्यंत कुठलीच कारवाई झाली नव्हती.

Previous article
Next article२३ नोव्हेंबरनंतर नववी-बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस! – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here