खामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर! सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

0
3849

मंगेश फरपट |

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ दीपालीचे पाटेखेडे धनोकार यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरांकनडून कौतुक होत आहे. सौ दिपालिताई ह्या मूळ खामगाव तालुक्यातिल बोथा काजी येथील आहेत.
सौ. दीपाली धनोकार ह्या मूळच्या खामगाव तालुक्यातील बोथा काजी येथील आहेत. त्यांचे वडील श्री सदाशिव पाटेखेडे असून ते सदन शेतकरी होते. पाटेखेडे यांचा मूळ परिवार काँग्रेस पक्षाचा असला तरीसुद्धा दीपालीताई आपल्या विचारासोबत भाजप सोबत राहिल्या आणि आज सुद्धा आहेत. दीपाली ताई ह्या जगातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या पिंपरी चिंचवड च्या 25 वर्षांपासून भाजपच्या सदस्य आहेत तसेच त्या विद्यमान महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस आहेत. त्या विदर्भासह पुणे विभागात सुद्धा आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे. सौ दीपाली पाटेखेडे धानोकर हे आपल्या राजकिय श्रेयाचे भाजपचे जेष्ठ नेते ,लोकनेते, स्व भाऊसाहेब फुंडकर, त्यांचे सुपुत्र भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया चे प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर, खामगाव मतदार संघाचे आमदार अँड आकाशदादा फुंडकर, खासदार अमरजी साबळे, अण्णांभाऊ साठे विकास महामंडळ चे माजी अध्यक्ष अमितदादा बोरखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी सौ उमाताई खापरे, पिंपरी चिंचवड भाजपा शहरअध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, आमदार लक्षणदादा जगताप, माजी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिवराव खाळे, एकनाथ पवार, माजी नगरसेवक माऊलीभाऊ थोरात , पिंपरी चिंचवड महिला मोर्चा अध्यक्ष सौ उज्वलाताई गावडे, नगरसेविका माऊलीताई थोरात, माजी महिला मोर्चा अध्यक्षा सौ शैलाताई मोडक, उप महापौर केशवजी घोळवे, भाजप संघटन मंत्री अमोलदादा थोरात, जिल्हा सरचिटणीस विजयजी फुगे, अमितदादा गोरखे, मोरेश्वर शेळके, राजूभाऊ दुर्गे, यांना देतात. खामगाव येथील छोट्याश्या गावातून गेलेली महिला आज पुणे सारख्या रेल्वे बोर्डावर गेल्याने खामगाव चे नाव देश पातळीवर उंचावले आहे. त्यांच्या या नियुक्तीचे खामगाव भाजपा महिला आघाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सेवा सुविधांवर भर देणार
दीपालीताई यांची नियुक्ती पुणे रेल्वे बोर्ड युजर्स कमिटीवर सदस्य म्हणून झाली आहे . पुणे डिव्हिजन म्हणजे कोल्हापूर, सांगली, लोणावळा ,पुणे ,दौंड ,बारामती, येथील या विभागातील रेल्वे युजर्सच्या रेल्वे प्रवासी व इतर कोणतीही जसे स्वच्छता, पार्किंग.. वेळापत्रकामध्ये बदल, डबा वाढवणे अशा सर्व अडचणी रेल्वे बोर्डावर पोचवून आपल्या समस्या सोडवण्याचे काम करण्यास त्यांची नियुक्ती झाली आहे. रेल्वे मधील जेवण, रेल्वेच्या परिसरातील अनेक अडचणी रेल्वे बोर्डामध्ये पोहोचवण्याचा आपल्या हक्काचा प्लॅटफॉर्म आपल्याला रेल्वे बोर्ड भारत सरकार च्या माध्यमातून मी आपणासाठी अविरत कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleशेतकऱ्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा बुलडाणा अजिंठा महामार्गावर रास्तारोको
Next articleयोगा, स्विमिंग पुल, सिनेमा हॉल व इनडोअर खेळ सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here