शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही तर उद्रेक होईल – रविकांत तुपकर
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयके रद्द करा यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज (ता.5 नोव्हेंबर 2020 ) बुलडाणा- अजिंठा महामार्गावर देऊळघाट येथे रास्तारोको करण्यात आला..
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने मा.राजू शेट्टी साहेब व मा.व्ही.एम.सिंग यांनी केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात देशभर आंदोलनाची हाक दिली होती. देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून ‘स्वाभिमानी’च्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथे हा रास्तारोको करण्यात आला.
या रास्तारोकोमध्ये शेतकरी विरोधी कृषी विधेयके सरकारने रद्द करावे.. शेतकऱ्यांना किमान हे.25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी..पिकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना 100% पिकविमा देण्यास सरकारने बाध्य करावे.. कापसाची हमीभावांने खरेदी करण्यासाठी तात्काळ CCI चे खरेदी केंद्र चालू करावे..तसेच संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याची वस्तुनिष्ठ आणेवारी 50 पैशाच्या आत काढण्यात यावी.. या मागण्या करण्यात आल्या..
केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसून जर सदर मागण्यां मान्य झाल्या नाही तर मग शेतकऱ्यांच्या उद्रेकाला केंद्र व राज्य सरकारला सामोरे जावे लागेल. असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला. तब्बल दिड तास झालेल्या या रास्तारोको मुळे बुलडाणा- अजिंठा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ युवा कार्याध्यक्ष राणा चंदन,विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम, आकाश माळोदे,प्रदीप शेळके, सैय्यद वसीम,महेंद्र जाधव,राजेश गवई,दत्ता जेऊघाले,सचिन सिरसाट,शेख सादिक गजानन देशमुख,विजय देशमुख,हाफिज खान, संतोष काकडे,गजानन गवळी,फकिरा निकाळजे,संदीप गोरे,संतोष गवळी,गोपाल जोशी,गणराज काळे,सुनील माळोदे,शेख वसीम, ज्ञानेश्वर माळोदे,अनिल पारवे,कुंदन गायकवाड,निलेश काकडे,प्रदीप तायडे सागर माळोदे, स्वप्निल जाधव, विष्णू दळवी,भागवत माळोदे, उमेश हिंगणे, संतोष गायकवाड, संतोष पन्हाळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..