गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

0
238

तेल्हारा: तालुक्यातील हिवरखेड येथील बस स्टँड ला लागून असलेल्या कराळे यांचे शेताजवळ नवीनच पडलेल्या प्लॉटमध्ये टॉवरच्या जवळील असलेल्या बाभळीच्या झाडाला एका स्त्रीने गळफास लावून आत्महत्या घेतलेल्या स्थितीत आढळून आली. सदर मृतदेह जवळपास अंदाजे दोन ते तीन दिवसांपासून लटकलेला असावा. मृतदेहाजवळ ऊन एक मोबाईल पोलिसांना मिळाला. मृतक महिलेचे नाव सौ संगीता भगवान वानखडे वय वर्ष ४० राहणार जळगाव (नहाटे). मृतक महिलेचे आपल्या पतीसोबत वाद होत असल्याने ती माहेरी राहत होती. असे मृतक महिलेचा भाऊ आकाश रघुनाथ सरदार राहणार दहिगाव अवताडे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला माहिती दिली हिवरखेड पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

Previous article1 हजाराची लाच घेणारा अमडापुरचा तलाठी अटक
Next articleशेतकऱ्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा बुलडाणा अजिंठा महामार्गावर रास्तारोको

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here