मंगेश फरपट | वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव: महसूल अधिकारी व कर्मचारी नियमित महसुलची कामे करतात. ही कामे करताना रात्री-बेरात्री आपला जीव धोक्यात घालतात. यामध्ये अवैध रेती उपशावर नियंत्रण मिळविण्याचे महत्त्वाचे काम महसूलचे अधिकारी व कर्मचारी करतात. तसेच नियंत्रणसाठी गस्त घालत असतात, परंतु चोरटे त्यांचे हालचालीवर लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे परिणामकारक प्रभावी कारवाई करणे कठीण होऊन जाते.
रेती चोरीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाचे ठिकाणी टिनपत्राची चौकी तयार करून तलाठी, मंडळ अधीकारी यांचे पथक तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी त्यांना अवैध रेती बाबत काही माहिती असल्यास त्यांनी 9153004343 या मोबाईल क्रमांक वर माहिती द्यावी किंवा टेक्स्ट मेसेज पाठवण्यात यावा. याकामी मदत करणाऱ्यास संबधितास योग्य बक्षीस देऊन महसूल मित्र म्हणून गौरविण्यात येईल. बांधकाम करणारे नागरिकांनी रेती बाबत पावती असल्याशिवाय रेती खरेदी करू नये. महसूल विभागामार्फत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन संबंधित जागा मालकाकडे रेती बाबत पावतीची तपासणी करण्यात येईल, तरी पावती शिवाय चोरटी रेती खरेदी करू नये.
या कामी पोलीस पाटील यांनी पुढाकार घेऊन खबर द्यावी. सदर प्रकरणी कर्मचारी / अधिकारी यांचा हलगर्जीपण अथवा रेती चोरीस सहकार्य आढळून आल्यास त्यांचेवर शिस्तभंग कारवाई प्रस्तावित केल्या जाईल तसेच यापुढे रेती चोरी प्रकरणी रेती चे वाहन सापडल्यास परिवहन विभागाचे अभिप्राय घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा खामगाव, उपविभागीय अधिकारी (महसुल) राजेंद्र जाधव, यांनी दिला आहे. तसेच वरील मोबाईल क्रमांकावर अवैध रेती उपसा विषयी माहिती असल्यास किंवा असे निदर्शनास आल्यास सूचित करावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.