सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार ; महिला व बालविकास मंत्री अॅड. यशाेमतीताई ठाकूर यांची माहिती

0
298

व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एलआयसी योजनेंतर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशाेमतीताई ठाकूर यांनी सांगितले.
मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत त्या बाेलत हाेत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, एलआयसी चे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अॅड. यशोमतीताई ठाकूर म्हणाल्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एलआयसी योजनेतंर्गत एकरकमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरु आहे. या योजनेंतर्गत सन २०२०-२१ या वर्षांत ९०० प्रकरणे आली होती. यापैकी ८७५ प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे त्रुटी असणारे आणि मागील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleआधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नका – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
Next articleआशा, स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची दिवाळी हाेणार गाेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here