व्यायामशाळेला आग; अंदाजे 13 लाखाचे नुकसान

0
255

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मेहकर :शहरातील सर्वात जुन्या असलेल्या भारत तालीम संघ या आखाड्याला 2 नोव्हेंबररोजी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच घटना घडली. यामध्ये अंदाजे सुमारे 13 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल परिसरात असलेल्या भारत तालीम संघ या व्यायाम शाळेला सोमवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत सागवणाच्या लाकडी खांबासह मल्लांच्या कसरतीसाठी असलेले संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून खाक झाले आहे. यामध्ये जवळपास 13 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सकाळी कामावर आलेल्या मजूरांना आग लागल्याचे लक्षात आले. आ. डॉ. संजय रायमुलकर, ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी घटनास्थळी भेट देवून नुकसानाची माहिती घेतली. भारत तालीम संघाला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन आ. रायमुलकर यांनी दिले. यावेळी तालीम संघाचे अध्यक्ष बबनराव भोसले, उपाध्यक्ष अर्जुन मिरे,सचिव देवदत्त, अनंत नवाडे, सचिन चुनडे, जयदेव पितळे, अमोल मिरे, मंगेश तट्टे, मोहन जाधव, सुरज बनचरे, रोहीत जाधव यावेळी उपस्थित होते.

Previous articleनिधीचा तुटवडा: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळेना!
Next articleआधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नका – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here