वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांचं मुंबईत निधन झालं.
त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी – परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली होती.संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांचं मुंबईच निधन झालं.केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला होता. डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी प्राप्त होती.
2 नोव्हेंबर रोजी तीर्थक्षेत्र पोहरागड येथे अंत्यसंस्कार
डॉ. रामराव बापू महाराजांवर परवा 2 नोव्हेंबर रोजी तीर्थक्षेत्र पोहरागड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी गर्दी करू नये असे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. महाराजांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. रामराव महाराज यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत मुंबई वरून पोहरागड येथे येईल.
कोण होते राष्ट्रीय संत डॉ रामरामबापू महाराज
गोर बंजारा समाज बांधवांचे धर्मगुरू राष्ट्रीय संत डॉ रामरावबापू महाराज यांचा जन्म श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील रामावत परिवारात झाला. बालपणीच वडील परसराम महाराज वैकुंठवासी झाल्याने वयाच्या 12 व्या वर्षी बापूंना परिसरातील 51 तांडयातील नायकांनी गादीवर बसविले. बापू यांनी तेव्हापासून अन्नत्याग करून जगदंबादेवी मंदिरात 12 वर्ष अग्नी अनुष्ठान लावून तपश्चर्या केली. त्यानंतर 12 वर्ष मौनधारण व्रत पूर्ण केल्यानंतर बापू देश भ्रमणाकरिता बाहेर पडले. यावेळी बापू तांड्यात जायचे. तेव्हा समाजातील नागरिक व्यसनाच्या आहारी गेल्याचे दिसल्यानंतर त्यांनी अनेक भक्तांची व्यसनं सोडवून चांगल्या मार्गावर आणले. देशातील अनेक प्रांतात बापूंचे बंजारा समाजाव्यतिरिक्तही भक्त आहेत.