टँकरची अपेला धडक ; 1 ठार, 1 गंभीर

0
260

खामगाव : दुधाची  वाहतूक करणा-या टँकरने अँपेला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जळका भडंग शिवारात शुक्रवार 30 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली.
भालेगाव येथील गौकर्णाबाई घोडके (वय 65 वर्षे) या महिलेच्या पायाला फ्रँक्चर झाल्याने त्या अरूण घोडके या त्यांच्या नातवासह खामगाव येथे दवाखान्यात गेल्या होत्या. दवाखान्यात पायाला प्लास्टर केल्यानंतर अरूण घोडके व गौकर्णाबाई अँपेने भालेगावकडे निघाले. मार्गात जळका भडंग परिसरात पिंपळगावराजाकडून भरधाव वेगाने येणा-या दुधाच्या टँकर क्रमांक एमएच 19 – 2129 ने अँपेला जोरदार धडक दिली. यात गौकणाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटोतील अरूण रमेश घोडके वय (वय 22), परमेश्वर रामचंद्र बनकर (वय 21) व अँपे चालक गजानन जावळे हे गंभीर जखमी झाले. अपघात एवढा गंभीर होता, की दुधाचे टँकर रोडवरच उलटले. यामुळे पिंपळगावराजा ते खामगाव मार्गावरील वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली होती. अरूण घोडके यांना उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघातानंतर टँकरचा चालक व क्लिनर यांनी घटनास्थळावरून पळ काढला.  पुढील तपास पिंपळगावराजा पोलिस करीत आहेत.

Previous articleसिं.राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान
Next articleप्रत्येक शेतक-याला मदत द्या, सोमवारी भाजपचे आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here