पत्नीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश

0
379

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
लातूर: निसर्गप्रेमी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांची पत्नी सौ. सोनम श्रीकांत यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी लातूर शहरातील राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक रस्त्यावरील दुभाजकामध्ये 33 झाडे लावून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
लातूर_वृक्ष टीम गेल्या पाच वर्षांपासून लातूर शहरात वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनाचे अत्यंत कौतुकास्पद काम करीत आहे. आपल्या स्वत:च्या किंवा आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावण्याचा, जगवण्याचा #लातूर_वृक्ष टीमचा हा उपक्रम अनुकरणीय आहे. आजपासून त्यांनी जागा नसलेल्या ठिकाणी मोठ्या ड्रम मध्ये माती टाकून झाडे लावण्याची पद्धत अवलंबिली आहे. त्यानुसारच आम्ही आज वृक्षलागवड केली आहे. #ग्रीन_लातूर_सुंदर_लातूर बनवण्यासाठी प्रत्येक नागरीकाने या चळवळीत सामील व्हावे, ज्या परीसरात झाडांची संख्या कमी आहे त्या परीसरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन यानिमित्ताने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी #लातूर_वृक्ष टीमचे पवन लड्डा (9326511681) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे

Previous articleशिंगणे साहेब, तुम्ही फक्तं सिंदखेड राजाचेच पालकमंत्री आहात काय?- भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ गव्हाळ यांचा सवाल
Next articleस्वाभिमानीच्या दणक्याने पूरग्रस्तांना न्याय; मदत निधी शेगाव तहसिलला प्राप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here