शिंगणे साहेब, तुम्ही फक्तं सिंदखेड राजाचेच पालकमंत्री आहात काय?- भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ गव्हाळ यांचा सवाल

0
509

मंगेश फरपट | वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

खामगाव: पालक मंत्री संपूर्ण जिह्याचे असतात मात्र डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केवळ आपल्या विधानसभा मतदार मतदारसंघाचेच पालकत्व घेतले की काय? अशी परिस्थिती दिसते आहे. त्यांनी शासकीय मदतीस पात्र असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यादीत 64 हजारापैकी आपल्या सिंदखेडराजा तालुक्यातील तब्बल 59 हजार शेतकरी घेतले आहेत.त्यामुळे शिंगणे साहेब फक्त सी. राजा तालुक्याचे पालकमंत्री आहेत काय? सवाल भाजप खामगाव तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ गव्हाळ यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत गव्हाळ यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,बुलढाणा जिल्हया मध्ये आणी खामगांव तालुक्यामध्ये सन २०२० ची खरीपाची पेरणी जुन-जुलै मध्ये आटोपली. त्यानंतर कुठे पाऊस तर कुठे उघड अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. त्यातच बोगस बियाणे मिळाल्यानेही हजारो शेतकऱ्यांना दुबार- तीबर पेरणी करावी लागली. त्यांनतर कसेबसे पीक जगलेली असताना अतिवृष्टीचे संकट ओढवले.जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण जिल्ह्यात अतिपावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आधी पावसाने नगदी पिक, उडीद, मुग,गमावले त्यानंतर तीळ व सोयाबीन, मका, कापुस, केळी, ऊस, फळबागा आदी पिकांची नासाडी केली. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात झालेली असून शेतकऱ्यांनी जगावे की, मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आणी अशातच बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री, यांनी अधिकाऱ्यांना नुकसानीचे सर्व्हे करण्याचे तोंडी आदेश दिले. एकही शेतकरी वंचीत राहता कामा नये. अशा मोठ मोठ्या वल्गना केल्या, बैठका वर बैठका घेतल्या. आणी शेवटी अहवाल आला की नुकसान फक्तं पालकमंत्री यांच्याच मतदार संघात झाले. इतर जिल्हा व खामगांव तालुका नगण्य पाऊस झाला, काहीच नुकसान झाले नाही. असे दाखविण्यात आले.शासनाच्या मदतीस जिल्ह्यातील 64 हजार 710 शेतकरी पात्र असून यात पालक मंत्री यांच्या एकट्या सी. राजा तालुक्यातील 59 हजार 410 शेकरी घेण्यात आले आहेत. तर खामगाव तालुक्यातील केवळ 1 हजार 915 शेतकऱ्यांचाच त्यात समावेश आहे. ही अन्यायकारक बाब असून शिंगणे साहेब फक्त सी. राजा तालुक्याचेच पालकमंत्री आहेत का? सिंदखेड राजाला एवढी मदत का? असे आमचे म्हणणे नसून जिल्ह्यातील इतर तालुक्यावर अन्याय का? त्यांनाही मदत द्या, जिल्हयातील इतर तालुके व शेतकरी का वंचीत ठेवता. नुकसान सर्वांचेच झाले आहे. आपण या सपुंर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, मग असा दुजाभाग का? जर खामगांव तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना शासनाने देवू केलेली मदत मिळाली तर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशाराही भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ गव्हाळ यांनी दिला आहे.

Previous articleमराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापीठ स्थापन करा !
Next articleपत्नीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here