बुलडाणा: जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबित यांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. योजनेनुसार उच्च माध्यमिक परीक्षा अर्थात इयत्ता 12 वी, पदवी या परीक्षेमध्ये 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन सन 2020-21 या वर्षात बीई, बीटेक, बी आर्च, बीडीएस, एमबीबीएस, बी एड, बीबीए, बीसीए, बी फार्मा, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या पाल्यांना लाभ देण्यात येतो. तसेच इतर अभ्यासक्रमांची यादी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या माजी सैनिकांची पाल्ये वर्ष 2020-21 या सत्रात शिक्षण घेत आहेत, अशा पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज व इतर माहिती सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या संकेतस्थळामध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या वरील अटी पुर्ण करीत असलेल्या माजी सैनिक / विधवा यांचे पाल्यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून त्यांचे अर्ज www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर संकेतस्थळामध्ये दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे तपासणी करीता सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे. तरी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुर्यकांत सोनटक्के यांचेशी संपर्क साधावा. किंवा 07262-242208 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.