आता शाळा सुरू कराव्यात, अकोल्यातील इंग्रजी शाळा संघटनांची मागणी

0
384
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कोविड – १९ ची साथ आटोक्यात येत असतांना विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातल्या सर्व शाळा तात्काळ सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी अकोला जिल्हयातील इंग्रजी शाळांच्या संघटनांनी केली आहे. नुकतीच आर.डी.जी. पब्लिक स्कूल येथे जिल्ह्यातील इंग्रजी शाळा संचालकांची एक बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये शाळा सुरु कराव्यात, बोर्ड परीक्षांच्या तारखा व अभ्यासक्रम जाहीर कराव्यात, शाळांचा कोरोना काळातील मालमत्ता कर, इलेक्ट्रीक बील माफ करण्यात यावे, शाळांचा गेल्या तीन वर्षांचा बाकी असलेला आरटीई फी परतावा त्वरीत देण्यात यावा, शाळांवर हल्ले करणाऱ्यांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, सक्षम पालकांनी फी भरावी असे आवाहन शिक्षणमंत्री महोदयांनी स्वतः करावे, फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करु नये, ऑनलाईन वर्गांसाठी फी भरणे अनिवार्य करावे, अशा मागण्यांचे ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आले.
तसेच या सर्व मागण्यांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे देखील ठरविण्यात आले. या सभेमध्ये श्रीकांत पिंजरकर, दिनेश भुतडा, अनोश मनवर, दिलीपराज गोयनका, अनिल राठी, प्रशांत मानकर, साहेबराव भरणे, प्रशांत जानोळकर, अमर हलवने, मनोहर विरवानी, अंशुमनसिंह गहलोत, प्रा. प्रकाश डवले, राजेश कड, दाभाडे मॅडम, प्रा. नितीन बाठे, प्रदिपसिंह राजपूत, प्रशांत गावंडे, डॉ. गजानन नारे, प्रा. सुधीर सरदार, मिलिंद शहा, गिरीश शिंदे, सुमन भालदाने, अरब साहेब, अलीसर , फाजील सर, अमर पाटील, मनिष अढावू, माया शहा, अवधूत ढेरे, असलम बेग, सुयश पाटील यांचे सह उपस्थित सर्व सदस्यांनी आपापले विचार मांडले. कोविड – १९ मुळे उद्भवलेल्या संकटाचा सर्व इंग्रजी शाळा संचालकांनी एकत्र येऊन सामना करावा; तसेच कुठल्याही संकटसमयी एकजुटीने उभे राहू असा निर्धार ही करण्यात आला.
प्रारंभी,  आरडीजी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या उषा वानखडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि शेवटी आभार प्रदर्शन केले. यावेळी जिल्हयातील इंग्रजी शाळांचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous articleऑनलाईन खरेदीत नांदुरेकरांची काेट्यवधी रुपयांची फसवणूक
Next articleबुलडाण्यात स्वाभिमानीने ठोकले महावितरण मुख्यालयाला कुलूप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here