बुलडाण्यात आज 55 पॉझिटिव्ह

0
291

बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 740 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 685 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 620 तर रॅपिड टेस्टमधील 65 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 685 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : गोंधनपूर 4,  बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : सातगांव म्हसला 1, चांडोळ 2,  मेहकर शहर : 1, मोताळा शहर : 3,  मोताळा तालुका : पिंपळगांव 1, वाघजई 1, जयपूर 2, लोणार शहर : 3, लोणार तालुका : गायखेड 1,  नांदुरा तालुका : टाकरखेड 1, चिखली तालुका : खैरव 2, कोलारा 1,  चिखली शहर : 5, सिं. राजा तालुका : रूम्हणा 5, सिं.राजा शहर : 1, पळसखेड चक्का 1, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आसलगाव 2, दे. राजा शहर : 3   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 64 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे.राजा : 4, मेहकर : 5, सिं. राजा : 10, मलकापूर : 11, शेगांव : 12, मोताळा : 2, खामगांव : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 13, स्त्री रूग्णालय 1. तसेच आजपर्यंत 41645 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8369 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8369 आहे. आज रोजी 2125 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 41645 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9055 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8369 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 565 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 121 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Previous articleजुन्या येरळीतील वंचित प्रकल्पबाधितांना घराचा मोबदला द्या: आ.राजेशभाऊ एकडे यांनी मांडली प्रकल्पग्रस्तांची व्यथा
Next articleऑनलाईन खरेदीत नांदुरेकरांची काेट्यवधी रुपयांची फसवणूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here