कपाशीवरील गुलाबी बोंडअळीवरील उपाययोजना

0
275

अकोला: किटकशास्त्र विभागामार्फत पिकावरील किड परिस्थिती संदर्भांत आढावा बैठक घेण्यात आले. या बैठकीत विदर्भातील सर्व संशोधन केन्द्र, कृषि विज्ञान केंद्र व कृषि महाविद्यालय येथील कार्यरत किटकशास्त्रज्ञ त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील कृषि अधिकाऱ्यासमवेत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाडयात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाच टक्क्यापर्यंत होता परंतु त्यात वाढ होऊन ऑक्टोंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात तो 10 टक्के झाला आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन पुढीलप्रमाणे उपाययोजना करावेत.  फेरोमोन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी  पाच फेरोमान सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे,  फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामधे मजुरांच्या सहायाने डोमकळया (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या, पाच टक्के निंबोळी अर्क किवा अॅझोडिरेक्टीन 0.03 (300 पीपीएम) 50 मिली किंवा 0.15 टक्के (1500 पीपीएम) 25 मिली प्रति 10 वी पाण्यात मिसळून फवारणी करावी, प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे २० बोंडे तोडून ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडक बोंड व अळ्यांची संख्या मोजून, ती दोन किडक बोंड किंवा दोन पांढुरक्या व गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून खालील सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

थायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्युपी 25 किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली  किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के ३० मिली किंवा इंडोक्साकार्ब  15.8 टक्के 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8  टक्के 10मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी, जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे अशा ठिकाणी आवशकते अनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही  एका मिश्र किटानाशाची  10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के अधिक डेल्टामेथ्रीन एक टक्के 17 मिली किवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3 टक्के अधीक लँब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के पाच मिली किवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के अधीक सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के अधीक ॲसीटागाप्रिड 7.7 टक्के 10 मिली. याप्रमाणे उपायोजना करावी, असे किटकशास्त्र विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.

Comments

 

Previous articleमहा विजयादशमी उत्सव ; शिवसेनेचा दसरा मेळावा
Next articleजुन्या येरळीतील वंचित प्रकल्पबाधितांना घराचा मोबदला द्या: आ.राजेशभाऊ एकडे यांनी मांडली प्रकल्पग्रस्तांची व्यथा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here