वºहाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. शनमुगराजन यांना वाशिम येथे जिल्हाधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची निवड प्रतिक्षेत होती. २३ आॅक्टोबररोजी उशिरा यासंदर्भातील आदेश प्राप्त झाले. तर त्यांच्या जागी अमरावती जिल्ह्यातील पांढरकवडा येथील उपजिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले आहे. एस. शनमुगराजन यांची कारकिर्द चांगली राहिली. त्यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचारी कर्मचाºयांना कधीही थारा दिला नाही. त्यामुळे त्यांचा चांगला दरारा राहिला. आता नव्या सीईओ भाग्यश्री विसपुते यांची कारकिर्द कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.