दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले तर FIR होणार दाखल…

0
273

मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क
नवी दिल्ली:
दसऱ्याच्या (Dussehra) दिवशी रावणाचा पुतळा जाळला तर तुमच्यावर एफआयआर (FIR) दाखल होऊ शकतो. जर एफआयआरनंतर पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही तर हे प्रकरण कोर्टाही जाऊ शकतं, असं म्हणणं आहे वकील ओमवीर सारस्वत यांचं. त्यांचं म्हणणं आहे की रावण महाराज यांचा पुतळा जाळल्यामुळे आमची आस्था दुखावली जाते. आम्ही रावणाची (Ravan) पूजा करतो. त्यांच्या या घोषणेमुळे पोलीस (Police) अॅक्शनमध्ये आलं होतं. बातचीतनंतर ओमवीर एफआयआर दाखल करण्याबाबत मानले, मात्र रावण जाळण्याचा विरोध जारी राहिल.
मथुरातील ओमवीर म्हणाले की…
मथुरामध्ये राहणारे वकील ओमवीर सारस्वत म्हणाले की, आम्ही रावण महाराजांच्या गोत्रातून आहोत. या आस्थेमुळे आम्ही त्यांची पूजा करतो. ते एक महान ज्ञानी आणि तपस्वी होते. मात्र काही लोक कुप्रथेमुळे प्रत्येक वर्षी रावण महाराजांचा पुतळा दहन करतात. मात्र पुतळा दहन केल्यामुळे काय होतं? आणि यामागे काय कारण आहे? लोकांना असं काही विचारल्यास त्यांच्याकडे काही उत्तर नसतं. यासाठी आम्ही एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओमवीर सारस्वत यांनी सांगितले की, आम्ही लवकरच यमुना किनाऱ्यावर रावण महाराजांच्या मंदिराची स्थापना करणार आहोत. हे मंदिर लहानशा जागेत असेल. मात्र येथे दररोज रावण महाराजांची पूजा होईल आणि ही एक सुरुवात आहे. यासाठी जनसंपर्क केला जाईल. ओमवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार रावण महाराजांना मानणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे.

रावण यांची पूजा करण्यामागे आहे हे कारण

वकील ओमवीर सारस्वत यांनी सांगितले की, रावण महाराज प्रकांड विद्वान होते, त्यांनी विद्वता, तप, युद्ध नीती, चिकित्सा नीती, धर्म परायण नीती विविध धर्मांंच्या संबंधित ग्रंथांमध्ये आजही पाहिले जात आहे. रावणाचा पुतळा दहन करणं हा ब्राम्हणांचा अपमान आहे. आणि स्वयं भगवान रामाचाही अपमान आहे. जर आपण भगवान रामाचे भक्त आहोत तर भगवान रामाचे आचार्य रावणाचा पुतळा दहन करू नये.

 

Previous articleप्रधानमंत्री आवास योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा – खासदार प्रतापराव जाधव
Next articleभाग्यश्री विसपुते बुलडाणा जि.प.च्या नव्या सीईओ; सीईओ शनमुगराजन यांची वाशिम येथे जिल्हाधिकारीपदी बदली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here