वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेल्या सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पाच्या माध्यमातून तसेच तालुका कृषी अधिकारी मुर्तीजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सिरसो व बिडगाव तालुका मुर्तीजापुर जिल्हा अकोला येथील शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्य पुस्तिकेचे वाटप व त्या विषयीचे मार्गदर्शन शेतकरी बंधूंना करण्यात आले.
कुलगुरू डॉक्टर व्ही. एम. भाले यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याचा मानस व्यक्त केला व त्याचाच आधार घेत मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांनी सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचा अभ्यास शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी कंबर कसली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भेंडे व गोरे तालुका कृषी अधिकारी मुर्तीजापुर यांनी जमिनीची आरोग्य पत्रिका या शासनाच्या कार्यक्रमाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री सुरज लाखे, शास्त्रज्ञ यांनी सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य या प्रकल्पात होणाऱ्या कामकाजा विषयी संबोधित केले. जमीन ही कशी सजीव आहे, शेतकऱ्यांनी दिलेले खत झाडांना किती प्रमाणात उपलब्ध होते त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्ये जसे की गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त व लोह यांची मुर्तीजापुर जिल्ह्यातील जमिनीत किती प्रमाणात कमतरता आहे याविषयी शेतकरी बांधवांना डॉ. संदीप हाडोळे, प्रभारी अधिकारी सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प यांनी माहिती विशद केली व सूक्ष्म अन्नद्रव्ये ही जमिनीत किती महत्त्वाची भूमिका पार पाडतात हे सुद्धा प्रात्यक्षिक स्वरुपात समजून सांगितले. तसेच जमिनीचे आरोग्य हे चिरकाल व्यवस्थित ठेवण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य हे हे फार मोठी भूमिका पार पाडत असून त्यांची दिवसेंदिवस वाढत असलेली कमतरता भरून काढल्यास संतुलितखताची मात्रा हे हे फार महत्त्वाचे असून शेतकरी बांधवांनी त्याकडे विशेष लक्ष दिल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल जमिनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवले जाऊ शकते. कार्यक्रमाच्या शेवटी ग्राम सिरसो व बीड गाव सरपंचांनी सर्व सदस्यांचे व शास्त्रज्ञांचे आभार मानले. वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वी करिता कुमारी पवार व सौ उमाळे व श्री राठोड यांनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी शास्त्रज्ञांनी व शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक प्रक्षेत्र ची भेट घेऊन वेळोवेळी येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.