जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मोबदला ; आ.डॉ. संजय कुटे यांच्या आंदोलनाची दखल

0
625

मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकºयांना नमुना ‘ड’ नुसार जमिनीचा मोबदला मिळणार आहे. या मागणीसाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जा. विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. संजय कुटे यांच्यासह शेतकºयांनी तब्बल ३६ तास केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले. जिल्हाधिकाºयांनी लेखी पत्र देवून याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक पार पडली. यात नमुना ड नुसार शेतकºयांना जमिनीचा मोबदला देण्याचे ठरले. या बैठकीत आ. डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाधिकाºयांना जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. यात प्रामुख्याने जमिनीचा मोबदला, पुर्नवसन आदी प्रश्न मांडले. या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
हा तर शेतकºयांचा विजय..
जिल्हा प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर मी माझे ठिय्या आंदोलन तूर्तास मागे घेतले असून जिगाव प्रकल्पग्रस्तांची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी यापुढेही अविरत संघर्ष सुरू राहील. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याकरिता ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले. अशा सर्व लोकप्रतिनिधींचे व शेतकरी बांधवांचे आ.डॉ. संजय कुटे यांनी आभार मानले आहे.

लढा सुरूच राहील.. पहा video काय म्हणाले, डॉ. संजय कुटे.. https://www.facebook.com/DrKuteSanjay/videos/670211370356562/UzpfSTEwMDAwMjYzMDMwMTg2MzozMjg3MjIxNDg0NzA4ODI5/
जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
भूसंपादन प्रकरणात मूळ संयुक्त मोजणी अहवाल आणि भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शक तिचा हक्क अधिनियम 2013 मधील कलम 11 नुसार घेण्यात आलेल्या हरकती त्यावर करण्यात आलेल्या चौकशी अहवाल व कलम 15 2 नमुना याची पडताळणी करून भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार मान्यता देण्यात येईल आणि मोबदला वाटपाबाबत कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे पत्र बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी आ.डॉ. संजय कुटे यांना दिले आहे.

Previous articleसंत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी सुरू करावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
Next articleशेतकरी मरणाच्या दारात आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here