वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 753 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 654 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 99 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 93 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 218 तर रॅपिड टेस्टमधील 436 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 654 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 22, बुलडाणा तालुका : दुधा 1 , साखळी 1, येळगांव 1, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : बोराखेडी 1, खामगांव शहर : 2, खामगांव तालुका : निमकवळा 3, पिं. राजा 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : पाडळी शिंदे 1, मेहुणा राजा 1, चिखली शहर : 16, चिखली तालुका : येवता 1, बोरगांव काकडे 2, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : डोणगांव 3, हिवरा आश्रम 2, मोळा 1, जानेफळ 3, दे. माळी 2, आरेगांव 1, कळंबेश्वर 2, लोणार शहर : 1, लोणार तालुका : सुलतानूपर 3, सिं. राजा तालुका : रूम्हणा 2, चांगेफळ 1, मलकापूर शहर : 5, शेगांव शहर : 3, शेगांव तालुका : वरूड गव्हाण 1, नांदुरा शहर : 2, संग्रामपूर तालुका : बावनबीर 1, मूळ पत्ता चांगलवाडी ता. तेल्हारा जि. अकोला येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 99 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 16 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 4, स्त्री रूग्णालय 1, अपंग विद्यालय 2, सिं.राजा : 1, खामगांव : 8,
तसेच आजपर्यंत 38637 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8050 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8050 आहे.
आज रोजी 1211 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 38637 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8794 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8050 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 627 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 117 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.