खामगाव : भाजपचे सरकार असतांना अनेक मंत्र्यांनी गैरप्रकार केलेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे देखील आरोप आहेत. असे असताना ना. यशोमतीताई ठाकुर यांना राजिनामा मागण्याचा कोणताही अधिकार भाजपवाल्यांना नाही अशी टिका माजी आ. दिलिपकुमार सानंदा यांनी केली आहे.
महिला व बालविकास मंत्री ना.श्रीमती यशोमतीताई ठाकुर यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांनी करणे ही बाब गैर असून एका न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम नाही. वरिष्ठ न्यायालयात ना. यशोमतीताई ठाकूर यांनी दाद मागितली आहे. त्यांना हमखास न्याय मिळेल असा आशावादही सानंदा यांनी व्यक्त केला आहे.