संग्रामपूर : पतीने दारुच्या नशेत पत्नीला मारहाण केली. यात पत्नीचा जागिच मृत्यू झाल्याची घटना सोनाळा शिवारात रविवारी घडली. धारणी तालुक्यातील डाबळा गावचे आदिवासी दाम्पत्य महिनाभरापुर्वी रखवालीसाठी सोनाळा येथे आले होते. १८ ऑक्टोंबर रोजी गणेश दयाळू बिलेविकर व त्याची पत्नी मिरा यांच्यात किरकोळ वाद झाला. दारुच्या नशेत असलेल्या पतीने लाकडी दंडूक्याने पत्नीला मारहाण केली. यात पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे.