नोकरीचे आमिष दाखवून ग्रामसेवकांने केले तरुणीचे लैंगिक शोषण !

0
322

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: नोकरीचे आमिष दाखवून आपल्याच नात्यातील एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात एका ग्रामसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे. प्रमोद गुलाब कटनकार असे या आरोपी ग्रामसेवकांच  नाव आहे.   तो अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समिती मध्ये कार्यरत आहे.या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या लहान उमरी येथे राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव(सुर्जी)येथील २८ वर्षीय रहिवाशी प्रमोद गुलाब कटनकार हा जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक पदावर शासकीय सेवेत आहे.आरोपी हा पीडित तरुणीचा दूरचा नातेवाईक असल्याने, त्याने पीडित तरुणीच्या ओळखीचा फायदा घेत,४मे२०१८ रोजी  अकोला रेल्वे स्टेशनवर बोलावून लैंगिक चाळे केल्याचे पीडितीने तक्रारी मध्ये म्हटले आहे. पुढे आंबट शौकिन ग्रामसेवकाने पीडित तरुणीला तू माझ्यावर प्रेम कर,नाहीतर  रेल्वे खाली आत्महत्या करण्याची धमकी देऊन, शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बाध्य केले. पीडित तरुणीने  त्याला संबंध प्रस्थापित करण्यासाठी विरोध केल्यावर, प्रमोद कनटकार याने तु पदवीधर आहे,आणि माझी वरीष्ठ अधिकारी यांच्या सोबत  ओळखआहे.तू माझ्या सोबत शारीरिक संबंध सुरू ठेवले तर,माझ्या ओळखीनेे शासकीय नोकरी लावून देईल, असे आमिष दाखवून,११फेब्रुवारी२०२० रोजी एसटी बस मध्ये  जालना येथे घेऊन जाऊन,जालना  बस स्थानका समोरील त्रिवेणी लॉज वर नेऊन रात्रभर बळजबरीने शारीरिक संबंध केले.तसेच त्याच लॉजवर नग्न अवस्थेत फोटो काढून, घडलेल्या प्रकारची कोठेही वाच्यता केली तर,तुझे हे फ़ोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन,वेळोवेळी तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला असल्याचे तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन सिव्हिल लाइन मध्ये१७ऑक्टोबर रोजी अपराध क्रमांक४२४/२०२० कलम३७६नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.

Previous articleसमायोजनातून 10 शिक्षकांच्या बदल्या
Next articleपंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आजपासून आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here