विषबाधा झालेल्या रुग्ण विद्यार्थ्यांची केली विचारपूस ; मुनगंटीवार यांचे स्वीय सहाय्यक यांची भेट

0
69

सावली तालुक्यातील पारडी या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या १०६ चिमुकल्यांना शाळेत मिळणाऱ्या पोषण आहारातू विषबाधा झाली. ही बातमी कळताच मा. आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करण्याचे तात्काळ निर्देश दिले. आता या सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. यातील काही मुले उप जिल्हा रुग्णालय मूल येथे 62 विद्यार्थी उपचार घेत आहे. मा.आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार या मुलांची आणि पालकांची भेट घेऊन प्रकृतीची आम्ही विचारपूस केली.सुधीर भाऊ सर्वोतोपरी सगळ्यांच्या सोबत आहे हे आश्वासन सर्व पालकांना दिले.या वेळी संतोष अतकारे स्वीय सहायक, बंडू गोरकर, नंदकिशोर रणदिवे, राकेश ठाकरे,किशोर कापगते,रुपेश मारकवार,संजय मारकवार, प्रवीण मोहुर्ले,गौतम जीवने मदतीस उपस्थित होते.

Previous articleट्रॅक्टरच्या धडकेत पती ठार, पत्नी व दोन मुले गंभीर जखमी
Next articleभेजगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here