मूल शहरातील एका इसमाने कर्मवीर मैदानावर असलेल्या झाडाला फाशी लागून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजताची दरम्यान घडली.
त्या इसमाचे नाव योगीराज कुळसंगे वय वर्ष 45 राहणार मुल असे आहे. सदर इसम मूल तालुक्यातील राजोली येथील नवभारत विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अद्याप कळु शकले नाही. मृतदेह मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. या घटनेने मूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.