मूल तालुक्यात गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

0
484

मूल तालुक्यातील चितेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे चार वाजताचे दरम्यान घडली. राहुल मंदावर वय 40 वर्ष असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.i

मृतक राहुल मंदावार हा डब्लू.सी. एल. दुर्गापूर येथे कार्यरत होता. काही दिवसापासून तो चितेगाव येथील आजोबाकडे राहत होता. आजी आजोबा बाहेरगावी गेले होते. राहुल हा घरी एकटाच असल्याने घरी कोणी नसल्याची संधी बघून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमकं कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.

घटनेची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. लगेच ही माहिती मूल पोलीसला देताच घटनास्थळी पोलीस हे दाखल झाले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

Previous articleशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मुल तालुक्यातील विरई येथील भाजपाचे असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश बल्लारपुर विधानसभेत संदिपभाऊ गिऱ्हे यांना मिळत आहे पहिली पसंती
Next articleजे.सी.आय मूल तर्फे मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here