Home मूल तळोधी पोलिसांनी व स्वाब संस्थेने केला रस्त्यावरील चिखल(गाळ) साफ सावरगाव – वाढोणा...
- तळोधी बा.
पोलीस स्टेशन तळोधी बाळापुर अंतर्गत येणाऱ्या सावरगाव – वाढोणा या रस्त्यावर बाजूने वाहणाऱ्या बोकडोह नदीला आलेल्या अचानक पुरामुळे या रस्त्यावर चिखल(गाळ) जमा झालेला होता. त्यामुळे पूर उतरल्यानंतर या रस्त्याने रहदारी सुरू झाली. मात्र सकाळपासून शेकडो दुचाकी व चार चाकी वाहनांचा या ठिकाणी गाडी स्लिप होऊन अपघात झाला. ही बाब तळोदी पोलीस व स्वाब संस्थेच्या निदर्शनास येताच त्यांनी तो रस्ता अग्निशामक दलाची नागभीड येथून गाडी बोलवून पाण्याचा प्रेशर व फावळ्यांच्याद्वारे या रस्त्यावरील (चिखल) गाळ बाजूला करून रस्ता पूर्ववत केला. पोलिसांनी स्वतः स्वाब संस्थेच्या सदस्यांसोबत सहभाग नोंदवत केलेल्या या परिश्रमाबद्दल रहदारी करणाऱ्या लोकांनी व परिसरातील लोकांनी त्यांचे कौतुक केलेले आहे.
यावेळी तळोधी बा. पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित सिंग देवरे व त्यांची तळोधी पोलीस कर्मचारी सोबतच स्वाब संस्थेचे यश कायरकर,जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, अमन करकाडे, गिरीधर निकुरे, शुभम निकेशर, तर पत्रकार भारत चुनारकर , कमलकिशोर चुनारकर , सावरगाव चे सरपंच रवी निकुरे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश निकुरे, शरद खांडेकर, यांनी या कार्यास सहकार्य केले.
© All Rights Reserved