व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: तुर, उडीद, मुग या कडधान्याची आयात थांबवण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिका-यांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक सिटी कोतवाली चौकात थाली बजाव आंदोलन केले. या आंदोलनात प्रहार सेवक मनोज पाटील, बॉबी पळसपगार , गोविंद गिरी, नूर सय्यद, कुणाल जादव, तुषार उज्जेनकर, श्याम क्षीरसागर, रोहित गावंडे, सागर भाकरे, शुभमसिंग ठाकूर यांनी सहभाग घेतला.