स्वागत …

0
288

नववर्षाची पहाट झाली; स्वागत आहे
नवीन स्वप्ने दारी आली; स्वागत आहे

निळे- सावळे डोंगर धुक्यात हरवून गेले
हिरवी पाती दवात न्हाली; स्वागत आहे

प्रसन्नतेला सोबत घेवून वारा आला
सुवास उधळत फुले म्हणाली, स्वागत आहे..

क्षितिजाच्या पलीकडे भरारी घेण्यासाठी
ही जिद्दी पाखरे निघाली; स्वागत आहे

दुख: कालचे विसरून, अश्रु पुसून टाकू
जीवना, तुझे हस-या गाली स्वागत आहे ..

कवी: किशोर बळी, अकोला
मो.क्र. ९४२१६७७१८१

Previous articleMPSC चा मोठा निर्णय, UPSC च्या धर्तीवर परीक्षा देण्यासाठी फक्त 6 संधी
Next articleथेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here