खामगाव : राज्यात होणारे महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी होत असल्याने भाजपा महिला आघाडीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी एसडीओ कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात सर्व तहसीलवर आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अती संवेदनशील काळातही शासनाच्या कोविड सेंटर व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. या वरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत उदासीन, असंवेदनशिल व निष्क्रीय असल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे हया बिघाडी सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आजच्या या आक्रोश आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
खामगाव तहसील कार्यालयासमोरील आंदोलनात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या अनिता देशपांडे, नगराध्यक्ष अनिता डवरे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ उर्मिला गायकी, शहराध्यक्ष रेखा जाधव , पं स सभापती सौ रेखा मोरे, उपसभापती सौ शीतल मुंडे, जान्हवी कुळकर्णी,नगरसेविका सौ दुर्गा हट्टेल,लता गरड, शिवानी कुलकर्णी, भारती गलांडे, लक्ष्मी मिश्रा, युवती प्रमुख सौ स्नेहा चौधरी, भक्ती वाणी, नगरसेविक सौ संतोष पुरोहित, रत्नमाला पिंपळे, शिवानी सचिन कुलकर्णी, बोर्डे काकू, श्रद्धा धोरण, प्रल्हादभाऊ बागडे, चंद्रशेखर पुरोहित सुरेश गव्हाळ, शरदचंद्र गायकी, संजय शिंनगारे, डॉ एकनाथ पाटील, समाधान मुंडे, भाजयुमो शहर अध्यक्ष राम मिश्रा, जितेंद्र पुरोहित , बजरंग दल विभागीय संयोजक अमोल अंधारे, जि प सदस्य डॉ गोपाळ गव्हाळे, पस सदस्य विलास काळे, विजय महाले, राजेश तेलंग, युवराज मोरे , किसान आघाडी तालुका अध्यक्ष संजय ठोंबरे, यांचेसह मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तर चिखली येथे आ. श्वेताताई महाले पाटील तर बुलडाणा येथे अलका पाठक, सरला बाहेकर, प्रभाताई कविमंडन, जळगाव जा. येथे अपर्णाताई कुटे, शेगाव येथे नगराध्यक्ष सौ. शकुंतलाताई बुच यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.