शेगाव जि. बुलडाणा : कृषी विधेयक 2020 ला राज्य सरकारने दिलेल्या स्थगनादेश तात्काळ उठवावा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा देत त्या स्थगनादेश परिपत्रकाची शेगाव शहर व तालुका भाजपाचे वतीने येथील तहसिल कार्यालयासमोर होळी करण्यात आली आहे.
यासंदर्भात तहसीलदार शिल्पा बोबडे यांचेकडे आज निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, गटनेते शरद अग्रवाल, संतोषबापू देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, तालुकाध्यक्ष विजय भालतडक, यांचे नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. या आंदोलनात गोविंदराव मिरगे, गजानन जवंजाळ, प्रदिप सांगळे, राजेंद्र शेगोकार, राजु अग्रवाल, डॉ मोहन बानोले, संजय कलोरे, कमलाकर चव्हाण, पवन महाराज शर्मा,प्रमोद काठोळे, सचिन ढमाळ,अमित जाधव , विजय यादव, निवृत्ती नांदोकार, अरूण कंकाळे, मुकिंदा खेळकर, डॉ राजेश सराफ, शशिकांत पुंडकर, प्रकाश भारसाकळे, भागवत रोठे,शंकर निळे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.