नातीवर अत्याचार करून चुलत आजोबाची आत्महत्या; खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील घटना

0
330

मंगेश फरपट
वºहाड दूत न्युज नेटवर्क
खामगावः
उत्तर प्रदेशात हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरण ताजे असतानाच तालुक्यातील कदमापुर येथील एका ५ वर्षीय चिमुरडीवर ५५ वर्षीय चुलत आजोबाने अत्याचार केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा उघडकीस आली. घटनेनंतर बदनामी होईल या भीतिपोटी आजोबानेही गाव शिवारातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
खामगाव ग्रामिण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमापूर येथे ५ वर्षाची चिमुरडी ही आपल्या मैत्रिणीसोबत खेळत असताना तिच्या चुलत आजोबाने घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर चुलत आजोबा घरातून निघून गेले. सदर घडलेला प्रकार चिमुरडीने सायंकाळी आई-वडिलांना सांगितला. मुलीला सोबत घेवून आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी चुलत आजोबाविरुद्ध कलम ३७६  (२)  (ग) भादवि कलम ४,६ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणेदार रफीक शेख यांनी दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
बदनामीपोटी संपविले जीवन
सोमवारी दुपारी १२ वाजता  गुराख्यांना आरोपी चुलत आजोबाचे प्रेत निंबाच्या झाडाला लटकलेले दिसले. ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचाNयांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. बदनामीच्या भीतिपोटी आरोपीने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Previous articleराज्य शासन सोयाबीन ३८८० रुपये हमी भावाने घेणार
Next articleकोरोनाचे पार्श्वभूमीवर आपल्या गावीच राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here