मुल – अबकी बार चारशे पार हा नारा देऊन भाजप नेते अनेक वर्षापासून संविधान बदलणार अशी भाषा बोलत असतील तर संविधान विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच देशाच्या लोकशाहीला दिलेला संविधान आहे. तेच यांना मनात नाही तर मग देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. कारण संसदेत अपमान तर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान आहे. म्हणून मुल येथील गांधी चौक येथे मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने गृहमंत्री अमित शाह यांना तात्काळ पदावरून खाली करावे अशी मागणी आंदोलन द्वारे करून देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मुल यांचे मार्फतीने निवेदन देण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरका ये अपमान, नहीं सहेगा हिंदुस्थान अशा आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली. कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेबांचे फोटो व संविधान हातात घेऊन तालुका काँग्रेसने आंदोलन करून निषेध केला.
भारतरत्न डॉ.आंबेडकर यांनी भारतात समतेचा स्वर्ग निर्माण केला, त्यामुळे आम्ही बाबासाहेबांचे नाव घेतो आणि घेत राहणार.सामान्य जनतेला आपले अधिकार आणि हक्क देणाऱ्या संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कधीच सहन केला जाणार नाही अशी टीका तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना जिल्हा काँग्रेसचे महासचिव सभापती राकेश रत्नावर, घनशाम येनुरकर, माजी नगराध्यक्ष विजय चीमड्यालवार, कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी नगरसेवक बाबा अझीम,विलास कागदेलवार, आकाश दहीवले, संचालक किशोर घडसे, महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, सचिव शामला बेलसरे,उपाध्यक्ष समता बनसोड, फर्जणा शेख, शकीला शेख, बंडूभाऊ गुरनुले, सुरेश फुलझेले, चंदू चटारे, करुणा सागर देव, डेव्हिड खोब्रागडे, सरपंच रवींद्र कामडी, भाऊजी लेंनगूरे,अमोल मोहूर्ले, सूरज टिकले, चेतन कामडे, पुरुषोत्तम साखरे, विवेक मुत्यलवार डॉ. पद्माकर लेंनगूरे, यादवराव रामटेके, कैलाश चलाख,अतुल गोवर्धन, धनराज रामटेके, दिलीप थेरे, अनिल साखरकर, श्याम पुटावार, यांचेसह काँग्रेसचे कार्यकर्ते, अनेक आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.