मुल शहरात आज भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे शहरात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुप्रसिद्ध भूगर्भतज्ञ प्रा. डॉ .सुरेश चोपणे यांनीही या घटनेला दुजोरा दिला. आंध्र प्रदेशात मुलगू या शहरात भूकंपाचे केंद्र आहे. या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल नोंदल्या गेली तर मूल परिसरात हा धक्का 4.0 रिश्टर स्केल असल्याचे डॉ. चोपणे यांनी मुल दर्पणला सांगितले.भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाल्याचे अजून पर्यंत वृत्त नसून भिंती हलने टेबल हलने घराचे सामान हल्ले टीना हलणे यासारख्या घटना घडल्याचे समाज माध्यमात सांगितल्या जात आहे.
जिल्हाधिकारी गौडा यांनी केले आवाहन
तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू
रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद
चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ;
नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी
चंद्रपूर दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.
या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. आव्हान यांनी केले आहे.