मुल:- बल्लारपूर विधानसभेच्या निवडणुकीत मुल येथे सुरू असलेल्या मतदान बूथवर पैसे वाटप करीत असल्याचा काँग्रेस भाजपाने एकमेकांवर आरोप केला. यामुळे नवभारत विद्यालयाच्या बूथ परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. काँग्रेस भाजप या दोन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठकल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. उल्लेखनीय म्हणजे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची पत्नी सपना मुनगंटीवार व मुलगी शलाखा मुनगंटीवार तसेच काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांची पत्नी ममता रावत व त्यांचा मुलगा रुपल रावत हेही घटनास्थळी उपस्थित झाल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते अधिक जोषात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून दूर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.