मूल :— राष्टीय सेवा योजना 2 कर्मविर महाविद्यालय तसेच बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल यांच्या संयुक्त विद्यमानाने मूल व तालुक्यातील ग्रामीण भागातील ताडाळा,चिचाळा, हळदी, भेजगाव,बेंबाळ,जुनासुर्ला,चांदापूर,बोरचांदली या गावानमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थांनी पथनाटयाच्या माध्यमताून जनजागृती केली तसेच मूल शहरातील पंचायत समिती समोर तसचे मूल बसस्थानक येथे मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदानाचे महत्त्व सर्वांना समजावे, मतदानाचे महत्त्व सर्वांना समजावे, लोकशाही अधिक बळकट व्हावी मूल तालुक्यातील शाळेतील मुलांच्या वतीने मूल शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत गटविकास अधिकारी बी. एच. राठोड, तहसीलदार मृदुला मोरे, नायब तहसिलदार यशवंत पवार, मुख्याधिकारी , गटशिक्षणाधिकारी वर्षा पिपरे, विस्तार अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. लोकशाही अधिक बळकट व्हावी म्हणून कर्मविर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी नागरीकांनामध्ये मतदान जनजागृती केली.
तसेच बल्लारपूर पब्ल्कि स्कूल मूल येथील प्राचर्य विनोद बल्लीवार सर यांनी विविध माध्यमातून ज्येष्ठ मतदार तसेच युवा पिढी यांना लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रबोधन केले.तसेच मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक शेलेकर सर व प्राध्यापक समीर अलुरवार यांनी ग्रामीण भागातील लोकांना मतदानाचे महत्व पटावे म्हणून आपल्या विद्यार्थ्यानं सोबत मतदान जनजागृतीचा प्रसार केला या मध्ये तेजस्वीनी तांगडे,आचाल ढोले,अर्पीता कडूकार,कशीश रामटेके,सेजल गावतुरे,मोनीका कोंटरंगे,स्वरा बाकडे,श्रृखल खोब्रागडे , प्रज्ञा रामटेके,गणेश तांदळे,आर्दीत्य आकूलवार इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक शेलेकर व प्राध्यापक समीर अल्लूरवार यांनी अथक परीश्रम घेतले.